हे देखील वाचा
मुंबई:- रावेर तालुक्यातील नांदूरखेडा येथील 200 च्या वर शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडून झालेल्या मेंढपाळ शेतकऱ्याला चौकशी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत म्हणून नुकसानभरपाई देऊ असे आश्वासन पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत दिले. विधानसभेत आज औचित्याच्या मुद्द्यामध्ये आमदार किशोर पाटील यांनी सदर पीडिताच्या शेळ्या व मेंढ्या दूषित तथा खतमिश्रित पाणी पिल्याने तडफडून मेल्या असून त्या मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावर ना. खोतकर यांनी यासंदर्भात चौकशी सुरु असून पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणे बाकी आहे. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या पीडितांना नुकसानभरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले.