कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने शालिमार एक्स्प्रेसने केला होता प्रवास ; मनपाचे रेल्वे प्रशासनाला पत्र
जळगाव: शहरात 28 रोजी कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा रुग्ण ज्या परिसरातील आहे आणि ज्यांच्या संपर्कात आला आहे, अशांची तपासणी केली जात आहे. हा रुग्ण 18 मार्च रोजी मुंबईहून जळगावला शालीमार एक्स्प्रेसने आला होता. एस-10 या बोगीतून या रुग्णाने प्रवास केला असल्याने एस-10 बोगीतून प्रवास करणाऱ्या जळगाव शहरातील नागरिकांची माहिती महानगरपालिकेने रेल्वे विभागाकडून मागितली आहे. यासाठी महानगरपालिकेने रेल्वे प्रबंधकांना पत्र दिले आहे. तसेच या बोगीतून प्रवास करणाऱ्यांनी स्वतः हुन तपासणी करून घ्यावे असे आवाहन देखील करण्यात येत आहे.