लखनऊ : सरकारी कामात अडथळा आणणार्या उत्तर प्रदेशातील मुजोर भाजप कार्यकर्त्यांना तुरूंगवारी घडविणारी लेडी सिंघम पोलिस अधिकारी श्रेष्ठा ठाकूर यांची अखेर बहारिच येथे बदली करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांचा सन्मान राखण्यासाठी श्रेष्ठा ठाकूर यांची बदली आवश्यक होती, असे वक्तव्य भाजपचे शहराध्यक्ष मुकेश भारद्वाज यांनी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत 11 आमदार आणि खासदारांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे समजते. पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देणार्या भाजप कार्यकर्त्यांच्या गराड्यातही सर्कल ऑफिसर श्रेष्ठा ठाकूर यांनी आपले कर्तव्य पार पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.