व्हिसेरा प्रिझर्व्ह ; अहवालानंतरच कळणार मृत्यूचे ठोस कारण
मुक्ताईनगर:- तालुक्यातील वढोदा वनपरीक्षेत्रातील डोलारखेडाजवळील सुकळी शिवारात 16 वर्षीय वाघिणीचा शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. भूकबळीने या वाघिणीचा मृत्यू झाल्याची चर्चा झाली असलीतरी शवविच्छेदनानंतर प्रत्यक्षात त्याचे कारण कळेल, अशी भूमिका वनविभागाने घेतली होती तर सूर्यास्तामुळे शुक्रवारऐवजी शनिवारी दुपारी एक वाजता वाघिणीच्या मृतदेहाचे वनविभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले मात्र त्यानंतरही वनविभागाने मृत्यूचे ठोस कारण सांगण्यास असमर्थता दर्शवली. व्हिसेरा प्रिझर्व्ह ठेवण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर आम्ही माहिती देऊ, अशी भूमिका वनविभागाने घेतली आहे. शवविच्छेदनानंतर वाघिणीच्या मृतदेहावर चारठाण्यात दफनविधी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.