‘त्या’ विवाहितेसह मुलीचा सापडला मृतदेह; पुलावरून घेतली होती उडी

0

अमळनेर । तालुक्यातील जळोद- बुधगाव येथील पुलावरून चहार्डी (ता.चोपडा) येथील विवाहितेने दोन चिमुकल्यांसह रविवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात उडी घेतली होती. बालकाचा मृतदेह रविवारीच सापडला होता. तर चार वर्षीय मुलीचा मृतदेह 19 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सापडला. तर मातेचा शोध घेतल्यानंतर दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मिळून आला आहे. चहार्डी येथील अनुराधा सिद्धार्थ वारडे (26) या मातेने आपल्या दोघ चिमुकले सिद्धी (4) व जयेश (पावणे दोन वर्षे) यांच्यासह जळोद-बुधगाव पुलावरून तापीत उडी घेतली होती. यापैकी जयेशचा मृतदेह रविवारीच हाती लागला होता. रविवारी बराच प्रयत्न केल्यानंतरही दोघींचे मृतदेह हाती लागले नव्हते. अंधार असल्याने रविवारी रात्री 8 वाजता शोधकार्य थांबविण्यात आले होते. सोमवारी सकाळी 5.50 वाजेपासून पुन्हा शोध कार्य हाती घेण्यात आले होते.