‘त्या’ व्यापारी संकुलच्या बांधकामावर थातूरमातूर कारवाई

नंदुरबार। नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या बहुचर्चित आणि वादग्रस्त व्यापारी संकुलाच्या अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेने थातूरमातूर कारवाई करून बांधकाम तोडण्याचा आव आणल्याचा प्रयत्न केला आहे. व्यापारी संकुलाच्या बांधकामाला हात न लावता केवळ ओट्यांवर हातोडा मारण्याची कारवाई केली. त्यात देखील जेसीबी मशीन काम करत नसल्याने मुख्याधिकारी आपल्या पथकासह दुसऱ्या मशीनची वाट पाहात बसले आहेत, आम्ही केवळ सार्वजनिक बोळ तोडायला आलो आहोत, बिल्डींग चा प्रश्न वेगळा आहे,असे मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.