‘त्या’ शाळांची नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांकडुन चौकशी

0

आ. किशोर पाटील यांच्या आरोपानंतर मुख्याध्यापकांचे घेतले लेखी जबाब


पाचोरा : तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात सन 2012पासुन शिक्षक भर्ती व नविन शाळा उघडण्यास शासनाची परवाणगी नसतांना जळगाव जिल्हा परिषदेत 13 ऑगष्ट 2015 ते 31 मे 2019 या कालावधित माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या सह्यांचे स्कॅनिंग करून बनावट सह्या व खोटे आवक जावक क्रमांक देउन संचमान्यता,शिक्षक भर्ती करणे आणी बोगस पटसंख्या दाखवणे याबाबतचे प्रकरण उघडकिस आल्यानंतर आमदार किशोर पाटिल यांनी पत्रकार परिषद घेउन हा प्रकार उघडकिस आणला होता.त्याची शाळांची शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडुन तातडिने दखल घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर शाळांचे विविध दप्तरांच्या झेरॉक्स प्रति ,समंधित मुख्याध्यापकांच्या स्वाक्षर्‍या करून सोबत नेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.यासोबतच समंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे लेखी जबाबही लिहुन घेतल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,जळगाव जिल्हा परिषदेत ऑगस्ट 2015 ते मे 2019 पर्यंत देविदास महाजन हे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणुन कार्यरत होते.मात्र शासनाच्या शिक्षण विभागाकडुन 2012 पर्यंत कुठल्याही प्रकारची शिक्षक भर्ती अथवा शाळांच्या नविन तुकड्यांना मान्यता देण्यात आलेली नव्हती मात्र जळगाव जिल्ह्यातिल सहा शाळांच्या संचालकांनी देविदास महाजन यांची सही स्कॅनिंग करून त्याचा फायदा घेत सन 2012 पासुन नवीन तुकड्या व शिक्षक भर्ती करून बनावट सह्या व खोटे आवक जावक क्रमांक दाखउन बेरोजगारांकडुन लाखों रूपये घेउन मोठ्या प्रमाणात शिक्षक भर्ती केल्याचे सध्या नाशिक येथिल महानगरपालिकेत शिक्षण विभागात कार्यरत असलेले देविदास महाजन यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे दिनांक 5/11/2019 रोजी समंधित प्रकरणाची चौकशी केली होती.सदरची माहीती पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटिल यांना मिळाल्याने आमदार किशोर पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या तक्रारिची प्रत मिळवुन पाचोर्‍यातील एका शाळेत जाउन तपासणी केली असता बोगस शिक्षक भर्ती व दाखविण्यात आलेली पटसंख्या याचा पत्रकार परिषद घेउन स्फोट केला.

शाळांमधील मस्टर आणि आवक-जावक रजीस्टरची तपासणी

नाशिक येथिल उपसंचालक नितिन बच्छाव यांनी तातडिने श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय बांबरूड महादेवाचे,माध्यमिक विद्यालय हातले (चाळीसगाव),माध्यमिक विद्यालय मुंदखेडे(चाळिसगाव), पी.के.शिंदे विद्यालय पाचोरा व आदर्श माध्यमिक विद्यालय पाचोरा येथे भेट देउन शाळेतील सन 2009-10 ते आजपर्यंतचे संचमान्यता,मागिल दोन वर्षाचे मस्टर,मागिल दोन वर्षाचे आवक- जावक रजिष्टर, वैयक्तिक मान्यता,पगार पत्रकाची पाहाणी केली यावेळी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांचे सोबत नाशिक येथिल शिक्षण विभागाचे उपनिरिक्षक श्री.शिंदे,जळगाव जि.प.माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटिल,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण,जळगाव जि.प.चे वेतन पथक अधिक्षक श्री.बारोट उपस्थित होते.यावेळी विविध शालेय दप्तराच्या मुख्याध्यापकांकडुन छायांकित केलेल्या प्रती,झालेल्या आरोपाबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे लेखी जबाब घेण्यात आले आहे. संस्थांना बोगस कागदपत्रे तयार करून देण्यात पाचोरा व भडगाव तालुक्यातिल दोन शिक्षकांचा सहभाग असल्याचे वृत्त असुन त्यांची सखोल चौकशी केली असता जिल्ह्यासह विभाग आणि राज्यातील असे प्रकार उघडकिस येण्याची दाट शक्यता आहे.