त्या हल्ल्यातील शस्त्रे जप्त

0

वासुली । खेड तालुक्यातील वासुली गावच्या उपसरपंचांच्या पुण्याई कॉम्प्लेक्समधील सायली ग्रुप या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सात जणांकडून बुधवारी (दि.30) रात्री गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता, स्टम्प, मोटार, घातकशस्त्र जप्त करण्यात आली.

सुरेश पिंगळे (वय 35) यांचे हे कार्यालय आहे. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सनी शिंदे याच्यासह भंगारमाल व्यावसायिक गुरूदास तेलंग, कामगार पुरवठा ठेकेदार राकेश येवले, प्रथमेश दौंडकर, हिरामण शेवकर, व अल्पवयीन सराईत गुन्हेगार या पाच जणांसह रोहित चव्हाण, अभिषेक टाकळकर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पिंगळे हे कामगार पुरवठा ठेकेदार आहेत. त्यांचा काही जणांशी वाद होता. त्यामुळे दोन्ही गटांकडून एकमेकांना टार्गेट करण्याचे प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू असल्याचे समजते. चाकण पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.