त्या हॉटेलवर पुन्हा छापा

0

नारायणगाव । नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील आर्वी फाट्यावर एका हॉटेलवर सलग दुसर्‍यांदा नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून 2 हजार 400 रुपयांचा दारूचा अवैध साठा व हुक्का पॉट जप्त केला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. याप्रकरणी उमेश गोफणे (रा. वारूळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 27) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास हॉटेलवर बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. व्ही. शिंदे, सुयोग लांडे, जायभाये, निखिल गोसावी, सचिन सातपुते यांनी हॉटेलवर छापा टाकला. या हॉटेलवर 19 ऑगस्टला छापा टाकून 4 हजार रुपयांचा दारूचा अवैध साठा जप्त केला होता. ही दुसरी कारवाई याच हॉटेलवर पोलिसांनी केली आहे.