त्रिकूटाने दोघांना मारहाण करीत ऐवज लुटला

14,000 was stolen by beating a young man in Bhusawal : Crime against the trio भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ तरुणासह त्याच्या मित्राला शिविगाळ करीत मारहाण करीत मोबाईलसह रोकड मिळून 14 हजारांचा ऐवज लुटण्यात आला. ही घटना 9 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी त्रिकूटाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयीतांविरोधात गुन्हा
तक्रारदार अमोल अर्जुन बाविस्कर (28, मोरेश्वर नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्यासह मित्र रीतेश जाधव (भुसावळ) हे 9 डिसेंबर रात्री आठ वाजेच्या सुमारास खडका चौफुलीजवळून येत असताना संशयीत आरोपी शेख रमजान शेख रऊफ, शेख अनिस शेख अनिस, शेख अमन उर्फ भोपाली (पूर्ण नाव नाही, सर्व रा.भुसावळ) यांनी शिविगाळ करीत मारहाण केली व बाविस्कर यांच्या खिशातील दोन हजारांची रोकड व 12 हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.