ऐनपूरला भेट ; पदवीधर शेतकर्याने केली नवीन वाणाची निर्मिती
रावेर– तालुक्यातील ऐनपूर येथील प्रगतशील व पदवीधर शेतकरी विकास दत्तात्रय महाजन यांनी सूक्ष्म नियोजन व अथक परीश्रमातून तयार केलेल्या ‘कमल विकास ए वन’ या वाणाची त्रिची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी पाहणी केली. केळी वाण नोंदणीची प्रक्रिया सुरू असून प्रक्षेत्र चाचण्यातून वाणाबाबत तांत्रिक बाबी पडताळणीसाठी चमू दाखल झाला होता. त्यात उद्यानविद्या वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.कुमार बी., कीटकशास्त्र वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पद्मनाभन, मृदा विज्ञानचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.के.जे.जयभास्करन, काढणी पश्चात तंत्रज्ञानचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.के.एन.शिवा व डॉ.पी.सुरेशकुमार यांचा समावेश होता. प्रसंगी पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.ईश्वर सिंह, विषय विशेषत्ज्ञ महेश व्ही.महाजन, सेंद्रीय शेती अभ्यासक सुनील पाटील व शेतकरी उपस्थित होते.