जळगाव । रसरशीत जीवनासक्ती, क्रांतिकारी सामाजिक जाणीव,संस्कृतीतून फुललेल्या प्रतिमा ही विंदा करंदीकरांच्या काव्याची आधारस्तंभ व वैशिष्टये विंदांची त्रिपदी या काव्यअभिवाचनाच्या कार्यक्रमातून आनंद करंदीकर व सरिता आवाड यांनी उलगडली. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या साहित्य मंडळ व मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी होते.
प्रोजेक्टरद्वारे कवितांचे सादरीकरण
प्रेम,निसर्ग,गंध,संगीत, व त्याबरोबरच भोवतालाचं जबरदस्त आकलन इत्यादींचे विलोभनीय दर्शन विंदांच्या कवितेतून घडते. कार्यक्रमात करंदीकरांच्या काव्यप्रकारांची ओळख करून देण्यात आली. विंदांची कविता ही जीवनाचे अंतमि सत्य शोधते. विंदा हे नैराश्यवादी कवी नाही, जगण्याची नवी उम्मेद देणारे कवी आहेत. ’ती जनता अमर आहे’, ’माझ्या मना बन दगड’ ’घेता’ ’सदगुरू वाचूनी सापडेल सोय, तेव्हा जन्म होय धन्य धन्य’ यासारख्या कवितेतून आयुष्य जगण्याची दिशा दाखवते.’जगण्याचे ब्रम्हानंद’ या कवीतेतुन जगण्याचा व भवष्यिाचा वेध घेतलेला आहे. सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ब्रम्हानंद’ असा जगण्याचा मंत्र विंदांची कविता देते. त्यांची चुकली दिशा तरीही, हुकले न श्रेय सारे. वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे ’ ही कविता निराशावादी युवकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन रुजवणारी आहे. या कवितेचे सादरीकरण सरिता आवाड यांनी केले.