त्रिपुरा निवडणूक : 59 जागांसाठी शांततेत मतदान

0

माकपच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचे आव्हान

नवी दिल्ली : त्रिपुरा विधानसभेच्या 59 जागांसाठी रविवारी मतदान शांततेत पार पडले. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखालील येथे डाव्यांचे सरकार असून, 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षाला भाजपने आव्हान दिले आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली.

20 जागा अनुसूचित जमातीसाठी
त्रिपुरा राज्यात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. चारीलम विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार रामेंद्र नारायण देब वर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे या ठिकाणी आता 12 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यात 20 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात चार सभा घेतल्या. मुख्यमंत्री माणिक सरकार हे पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी लढत देत आहेत. प्रचार मोहिमेचे नेतृत्वही त्यांनीच केले असून, राज्यात 50 सभा घेऊन ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.