शिक्षण हाच उन्नती व विकासाचा राजमार्ग
आयएएस सलमान खान यांचे प्रतिपादन; चाळीसगावात गुणवंतांचा सत्कार
चाळीसगांव – जिद्द आणि चिकाटी असली तर कितीही कठीण परीक्षेत ही यश नक्कीच मिळते. शिक्षण हाच प्रत्येक घटकांचा उन्नतीचा व विकासाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील आयएएस अधिकारी सलमान खान यांनी आज येथे केले. त्रिमूर्ती एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटी व ऑल इंडिया तहेरीके खुदादाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर गाईडन्स व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
मेहनतीची तयारी ठेवा
शहरातील नगरपरिषद मंगल कार्यालयात सांयकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी उपमहापौर करीम सालार होते. सलमान खान यांनी आपल्या खडतर प्रवासाबद्दल माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यूपीएससी परीक्षेत दोनदा अपयशी ठरलो. तरी निराश झालो नाही. जिद्द व चिकाटी ठेवत पुन्हा परीक्षेला सामोरे गेला. यशाचे शिखर गाठले असे ते म्हणाले. तुमच्यासाठी शिक्षणाचे सर्व दारे उघडी आहेत. मेहनत करण्याची तयारी ठेवत स्वत:वर संयम ठेवा. अभ्यासाची कास धरा. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळेच माणुस आपली आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारू शकतो असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
शेख अल्लाओददीन चिरागोददीन यांनी प्रास्तविक व आभार मानले. तर अफसर खाटीक सर व रफिक मणियार यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रियाज शेख, अमजद खान, नसीर शेख, मुतंजीम शेख, तयुब खान, मोहसिन, अमजद बिल्डर, विजय चौधरी, तौकल बागवान, फारुख शाह, शाहरूख शाह, बबलू मन्यार, रफीक मन्यार यांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सत्कार
यावेळी दहावीच्या परीक्षेतिल गुणवंत विद्यार्थीना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यात सय्यद सिमरन नाझ, खान शबमन बी साजिद, शेख अर्सला अंजुम इकबाल ,अमेरा बानो मुश्ताक अहमद ,खान महमंद अजहर, अरशीन बानो शेख रफिक, समिया नाझ आयाज खान, सानिया काजी नइन मोहंमद, रंगरेज झीनत अफिफा ,शेख उझमा सालेम, खान सुमियाँ बानो, रंगरेज सबा कौसर, सैय्ययद मिनाझ रुकनोदद्दीन, खान आफ्रिन, खान सना बी, शेख कौसर बानो या विद्यार्थ्यांचा समावेश होता.