पिंपरी-चिंचवड : निगडीतील त्रिवेणीनगर येथून एका तडिपार गुंडास त्याच्या साथीदारासह निगडी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून दोन कोयते, दुचाकी व 15 हजार 400 रुपयांची रोकड असा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. रवी शंकर लोंढे (वय 23, रा. विजयनगर, चिंचवडगाव) व गणेश लक्ष्मण औकिरे (वय 22, रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
खबर्याकडून मिळाली होती टीप!
चिंचवड पोलीस स्टेशनकडील तडिपार आरोपी रवी लोंढे हा शस्त्रांसह त्रिवेणीनगर चौकात येणार आहे, अशी खबर निगडी पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने लोंढे व त्याचा साथीदार औकिरे याला अटक केली. यावेळी त्यांच्याडून दोन लोखंडी कोयते व एक दुचाकी असा एकूण 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र तव्हाण, तात्या तापकीर, सुनील शिंदे, चेतन सावंत, रमेश मावसकर, विश्वास नाणेकर, संजय मरगळे, शरीफ मुलाणी, जमीर तांबोळी, मच्छिंद्र घनवट, मंगेश गायकवाड यांनी केली.