जळगाव । आजच्या स्पर्धेच्या युगात ग्राहक हा मध्यवर्ती आहे. ग्राहक व व्यवस्थापनाचे संबंधात विश्वासार्हता वाढीस लागावी. ग्राहकांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी ,यासाठी सेवेबद्दल प्रतिक्रिया वा तक्रारी नोंदविण्याची सोय असणे अनिवार्य आहे. त्यानंतर ग्राहकांच्या समस्या व तक्रार निवारणासाठी सोपी,जलद व प्रभावी व्यवस्था उपलब्ध असली पाहिजे. ग्राहकाचे हित लक्षात घेऊन विद्युत कायदा 2003 नुसार महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या विद्युत ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना या यंत्रणेची माहिती होणे आवश्यक आहे. माहितीपुर्ण समाज हा चांगली व्यवस्था घडविण्यात महत्वाची भुमिका बजावित असतो. या लेखाच्या माध्यमातून विद्युत ग्राहकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न आहे. ‘न्याय आपल्या दारी’ या भुमिकेतून वीज ग्राहकांच्या तक्रार प्रकरणाची सुनावणी मुंबईतल्या कार्यालयाऐवजी स्थानिक पातळीवर घेणे त्यांनी पसंत केले. ग्राहक हा सेवेचा केंद्रबिंदु आहे, हे अधोरेखीत केले.