त्रीसदस्यीय समितीची 11 ला बैठक

0

भुसावळ: शहरातील गोपाळ नगरासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकुलातील गाळे भाडे तत्वावर देण्यासंदर्भात त्रीसदस्यीय समितीची सोमवार, 11 रोजी बैइक होणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या विषयात लक्ष घातल्यानंतर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, जळगाव टाऊन प्लॅनर व मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत गाळे किती व कशा पद्धत्तीने लिलावात विक्री करावयाचे यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. भुसावळ भेटीवर आलेल्या जिल्हाधिकार्‍यांकडे शहर विकासाची तळमळ असलेल्या उपनगराध्यक्ष युवराज लोणारी याबाबत पाठपुरावा केला होता.