जळगाव : आंध्र प्रदेशाच्या कीनारपट्टीवर आलेल्या वरदा वादळामुळे उत्तरेकडून येणार्या शीत वार्यांना आडकाठी झाल्याने जळगाव शहरात थंडीची जोर कमी झाला आहे. गेल्या पाच दिवसांत किमान तापमानात पाच अंशाने वाढ झाली आहे. 9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले कीमान तापमानात वाढ होवून 14 अंशापर्यंत आले आहे.
नोव्हेंबरपासून जळगावात थंडीची चाहूल लागली .त्यानंतर दोन आठवडे थंडीची हुडहुडी कायम होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या नाडा या वादळामुळे किमान तापमान वाढून 15 अंश सेल्सिअसपर्यंत गेले. या वादळानतंर पुन्हा तापमानत घट होवून दि. 11 डिसेंबर 2016 पर्यंत किमान तापमान 9.2 अंश सेल्सियसला पोहचल्याने थंडीचा कडाका वाढला. या आठवड्यात पुन्हा आंध्र प्रदेशात आलेल्या वरदा वादळामुळे उत्तरेकडील वारे रोखले गेल्याने कीमान तापमानात वाढ झाल्याने थंडी ओसरली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात तापमानात चढ उतार राहीला. या बदलत्या तापमानामुळे जळगावकरांना खोकला व सर्दीचा त्रास जाणवू लागला आहे. तापमानातील अचानक होणार्या बदलांमुळे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये व्हायरल आजारांचे प्रमाणे वाढत आहे.