थंडीची लाट येणार!

0

पुणे : येत्या 24 तासांमध्ये उत्तरेकडील राज्यातील हिमवर्षावाचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार असून, थंडीची तीव्र लाट येणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये या थंडीची तीव्रता अधिक असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थंड हवेपासून वाचण्यासाठी उबदार कपड्यांचा आधार घ्यावा, अशी सूचना आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी वाढत चालली आहे. शुक्रवारी उस्मानाबादेत 9 अंश, परभणीमध्ये 11, औरंगाबादेत 12, जळगावमध्ये 10, नाशिक आणि पुण्यात 11 अंश तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासांत या तापमानात आणखी 2-3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.