रावेर:- रिलायंन्ससह टाटा, बीपीएल मोबाईल कंपन्यांनी महसूल विभागाचा कर मुदतीत न भरल्याने तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी तालुक्यातील 13 गावातील मोबाईल टॉवर सील करण्याचे आदेश गुरुवारी दिले. वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषिक परवानगी नसल्याने आधीच नोटीसा देऊन कर भरण्याच्या सूचना वारंवार देऊन सुध्दा न भरल्याने अखेर रिलायंन्स कंपनीच्या 13 टॉवर तर टाटा कंपनीचे एक टॉवर, बीपीएल कंपनीचे एक टॉवर सील करण्याचे आदेश देण्यात आले.
पंधरा टॉवरकडे 13 लाखांची थकबाकी
13टॉवरकडे प्रशासनाची 13 लाखांची थकबाकी आहे. त्यात रावेरातील दोन, पालसह बलवाडी, कर्जोद, सावदा, ऐनपूर, निंबोल, खिरोदा, चिनावल, भाटखेडा, निंभोरा, विवरे तर सावदा येथील तीन टॉवर मिळून एकूण 15 टॉवर 13 लाखांची थकबाकी वसुल करणे बाकी आहे.