थकबाकीचा डोंगर ; मुक्ताईनगरात सबस्टेशन सील

0

मुक्ताईनगर– मार्च एण्ड जवळ येत असलेल्या थकबाकी वसुलीवर शासकीय कार्यालयांनी भर दिला असताना काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीने महसूल प्रशासनाकडे थकबाकीचे कारण देत नगरपंचायतीचा वीजपुरवठा कट केला होता तर त्यास प्रतिउत्तर देत मुक्ताईनगर महसूल प्रशासनाने गुरुवारी दुपारी वीज वितरण कंपनीकडे थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने वीज कंपनीने सबस्टेशनच सील केले.