थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली

0

तळोदा/नवापूर। नंदुरबार जिल्ह्यातील विविध करांची थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजले जात आहे. यात तळोदा नगरपालिका कर्मचारी थकीत करांच्यावसुलीसाठी ढोल पथकासह करदात्यांकडे जात आहे. पालिकेच्या अनोख्या वसूलीकडे नागरिकांचे लक्ष जात आहे. तसेच नवापूर येथे देखील थकीत कर्ज वसूलीसाठी थकबाकीदारांचे नाव डिजीटल बॅनरवर लावण्यात आले आहे.

थकीत करांच्या वसुलीसाठी क्लृप्ती
तळोदा पालिकेची करवसुली विविध मार्ग वापरून गोळा होत नसल्याने आता वसुली साठी थकबाकीदाराच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली केली जात आहे. आज सकाळ पासून शहरातील विविध भागात ढोलचा आवाज जोरजोरात घुमू लागला… गल्लीतील सर्वच अवाक होऊन पाहत असून त्यांच्याकडे काय कार्यक्रम आहे… आपणास निमंत्रण नाही अन् कल्पनासुध्दा नाही…अशी चौकशी सुरू झाली.. मात्र पालिका प्रशासनने नगरपालिकेचे वसुली पथक.. ढोलसह जात असल्याने या क्लुप्तीचमूळे वसुली होत असून पालिका कर्मचारी कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

वारंवार नोटीस देऊनही नागरिकांची टाळाटाळ
शहरातील अनेकांकडे विविध करांपोटीची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार सूचना देऊन… पत्र देऊन… नोटिसा देऊनही कर भरण्यास करदाते कर भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. वसुलीसाठी पालिका कर्मचारी थकीत करदात्यांकडे वारंवार चकरा मारून देखील वसूली होत नव्हती. अनेकदा वसुली कर्मचारी खाली हाताने परतत यामुळं करवसुली साठी विलंब् करणार्‍यांच्या घरासमोर वसुली पथकासह ढोल वाजविण्याची नामी शक्कल मुख्याधिकारी जनार्धन पवार व वसुली प्रमुख राजेंद्र पाडवी यांनी शोधली.

आधी सुविधा द्या मग कर मागा
या वसुली पथकात राजेंद्र सेंदाने, विजय सोनवणे, सुनील माळी, राजेंद्र माळी, मनोज परदेशी, दिगंबर माळी, नितीन शिरसाठ, गणेश गावित, दिलीप वसावे, मोहन माळी, अश्विन परदेशी, अनिल माळी, राजेंद्र माळींसह आदींचा समावेश होता. भरपूर वसुली होत असल्याचे मत पथकाने व्यक्त केले. तर उच्चभ्रू वस्तीतच वसुलीची मोहीम का?, जरा अन्य भागाकडेही वळा, असे मत काहीजण व्यक्त करीत होते. नगरपालिकेने शहराच्या सर्वच भागात ही मोहीम राबवावी, ठराविक भागालाच टार्गेट‘ करू नये, असे मत अनेकांनी व्यक्त केले. तर आधी सुविधा द्या मग कर मागा, असा दणकाही काही जणांनी लगावला. याबाबत पालिकेचे करनिरीक्षक राजेंद्र पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता एकूण थकबाकीदार 77 एकूण थकबाकी 1 कोटी 20 लाख रुपये पैकी 50 लाख वसूल झाले असून 70 लाख रुपये अजूनही वसुली बाकी आहे. यात मोठे बाकीदार ज्यांची बाकी 10 हजारावर आहे असे 145 नागरिक असल्याची माहिती दिली.

लाऊड स्पिकर लावून जनजागृती
नवापुर । नगरपालिका विशेष वसुली मोहीम कर भरा जप्ती टाळा रोज नवापुर नगपालिका कर्मचारी ढोल तासांचा गजरात व वाहनावर लाऊड स्पिकर लाऊन जनजागृती करत आहे. यामुळे नवापुर शहरातील ज्याचा कडे जास्त नळपट्टी, घरपट्टी व इतर कर वसुली बाकी आहे ते धास्तावले आहेत. जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा प्रभारी मुख्यधिकारी शांताराम गोसावी कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, पाणी पुरवठा विभागाचे संजु शिरसाठ, वसुली विभागाचे अनंत पाटील, प्रेमानंद गावीत, वामन अहिरे, मोहमत पठाण, प्रकाश बाम्हणे, रमेश सोनार, भरत सोनार हे कर्मचारी सकाळी 8 वाजे पासुन ही मोहीम सुरु करुन कर वसुली करत आहे. जे नागरीक कर भरत नाही त्यांचे नळकनेकशन कापुन कार्यवाही करताना दिसत आहे. आता पावेतो नगरपालिकेची 45 टक्के वसुली झाल्याची माहीती मुख्यधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे. तसेच नवापुर नगरपालिकेचे नगरसेवक स्वतःहुन कर भरताना दिसुन आले. थकबाकीदारांची नावे डिजिटल बॅनेरवर झळकावून जास्तच जास्त थकबाकी करवसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हाधिकारी कल्लशेटी यांनी 100 टक्के कर वसुलीचे सक्त आदेश दिले आहेत. या मुळे सर्व नगरपालिका कर्मचारीर्‍यांना वसुली साठी नेमण्यात आले आहे. नगरपालिका कर्मचारी करवसुली करण्यात मग्न झाले असून सध्या अनेक कुल्पत्या लढवून करवसुली केली जात आहे.

पंधरा ते वीस जणांचे वसुली पथक
पंधरा ते वीस जणांचे महिला व पुरुष पथक रजिस्टर, याद्या व पावतीबुके घेऊन फिरू लागले असून अन् लोकही शरमून चटकन पैसे देऊन मोकळे होत आसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वारंवार भेटूनही थकबाकी देण्यास टाळाटाळ करणारे, आढेवेढे घेणारे नगरपालिकेच्या या उपक्रमाने चक्रावून गेले… तर वसुली समाधानकारक होत असल्याचे पाहून मुख्याधिकारी व वसुलीप्रमुख मात्र खूश झाले.