थकबाकीदारांविरोधी धडक मोहीम

0

येरवडा । महावितरण विभागाच्या वतीने थकबाकी ग्राहकावर धडक मोहीम कारवाई राबविण्यात येत असल्याची माहिती खराडी विभागाचे सहाय्यक अभियंता राहुल पालखे यांनी दिली. पालखे म्हणाले, खराडी-चंदननगर परिसरात सध्या खासगी जाळ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने या भागात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करून टोलेजंग इमारती उभारल्याने परिसरात लोकसंख्येत ही अधिक भर पडत असून या भागात महावितरणचे जवळपास 50 ते 60 हजार ग्राहक आहेत. त्यातच परिसरात अनेक छोट्या-मोठ्या सोसायटयांचा परिसर असल्याने एखाद्या ग्राहकांचे वीजबिल थकले असेल तर प्रथम आम्ही येथील सोसायटीप्रमुखांना वीजबिल ठाकल्याबाबत माहिती देऊन ही जर एखाद्या ग्राहकाने बिल न भरल्यास त्यांना नोटीस देऊन समज देण्यात येते. त्यातच बहुतांश प्रमाणात उच्चभ्रू सोसायट्यांच्या परिसर असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बिले थकत जरी नसतील तरी पण कायद्याच्या नियमाप्रमाणे आम्हाला काम करणे गरजेचे आहे.
त्यातच अनेक ग्राहकांना मीटरमध्ये तफावत असल्याचे ग्राहक सांगत असतात. त्यामुळे त्यांना प्रथम मीटर तपासणीसाठी कल्याणीनगर येथील मुख्य कार्यालयात मीटर तपासून घेण्याचे ग्राहकांना सांगून जर एखाद्या मीटरमध्ये खरोखरच तफावत असून मीटरचे रेडींग जास्त होत असेल तर त्यांना वीजबिल कमी अथवा मीटर बदलून देण्याचे काम कर्मचारी करत असतात. याबरोबरच खासगी कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने कंपनीधारकांना देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नियम राबवून अशा कंपन्यांवर देखील त्यांनी वीजबिल न भरल्यास कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.