थकबाकीपोटी यावल तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा कट

0

यावल- 41 हजारांचे वीज बिल थकल्याने यावल तहसील कार्यालयाचा गुरुवारी वीजपुरवठा खंडित केल्याने खळबळ उडाली आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीकडे तालुक्यातील विविध विद्युत उपकेंद्राचा महसूल कर सुमारे तीन लाख रुपये थकला असता वीज कंपनीने केलेल्या कारवाईने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रसंग ओढवला आहे. विद्युत वितरण कंपनीचे तहसील कार्यालयाकडे 41 हजार 390 रपये बिल थकले होते व त्या करीता नोटीस देण्यात आली होती मात्र तरीदेखील बिल अदा न केल्याने विद्युत कंपनीकडून गुरूवारी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.