थकीत कर न भरणार्‍यांना पालिकेने बजावले वारंट

0

वरणगाव। शहरात 2016 पासून ते 2017 च्या मार्चअखेरपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी करवसुली न भरल्यामुळे नगरपालिकेमार्फत चार जणांना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 चे कलम 152 अन्वये वारंट बजावले आहे व दोन दिवसात सिल लावण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीपासून कर वसूली नागरीकांकडे थकबाकी होती. मात्र ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाले असतांना देखील थकबाकीत वाढ झाली आहे.

बाजार समितीकडे चार लाखांची थकबाकी
ही थकबाकी शासनाच्या आदेशानुसार मार्च अखेर वसूली पूर्ण व्हावी या दृष्टीकोनातून पालिकेच्या माध्यमातून येथील वरणगाव उपकृषी उत्पन्न बाजर समितीकडे रक्कम 4 लाख 27 हजार 627 रूपये, टाटा इन्डीकॉम लिमिटेड कंपनी रक्कम 1 लाख 19 हजार 400 रुपये, भारत संचार निगम लिमीटेड रक्कम 63 हजार 790 रुपये तसेच सै. फारूख सै. कादिर 30 हजार 214 रुपये असे एकुण 7 लाख 21 हजार 31 रुपये कर वसुली बाकी असल्याने 31 मार्च 2017 रोजी मु्दतीत बद्दल समासान निर्दिक केलेले. विशेष करा संबधाने येणे असलेली आणि नियम 150 अन्वये वसुल कराराची रक्कम भरली नाहीत.

यांनी बजावले वारंट
समाधानकारक कारण दाखविले नाही आणि ज्या अर्थी त्या रक्कमेच्या मागणीची नोटीस ज्याच्यावर बजावली पासून 15 दिवस होऊन गेले आहेत. म्हणून 29 रोजी वरिल चार जणांवर वांरट बजावण्यास आले आहे. कर थकीतदारांनी शुक्रवारी कर न भरल्यास सिल लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगीतले. वारंट बजावणारे पालिकेचे कर्मचारी ओएस गंभीर कोळी, करनिरिक्षक अनिल तायडे, दिपक भंगाळे, गणेश तळेले, गोकूळ भोई आदी होते.