थकीत कर वसुलीसाठी नवापूर नगरपालिकेची विशेष मोहिम

0

नवापुर। नवापुर नगरपालिकेने शुक्रवारपासुन थकीत घरपट्टी व नळपट्टी वसुली मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नवापुर शहरातील नॅशनल हायवे 6 जवळील असलेले एरटेल कंपनीचे टावर सिल करण्याची कारवाई सुरू करण्यता आली आहे. टावरचा पेटीला नगर पालिका वसुली कर्मचारी यांनी कुलुप लाऊन सिल केले. या टावरची 97 हजार रुपये एवढी थकबाकी 3 वर्षांपासुन बाकी होती. वसुली दरम्यान कर भरण्याबाबत कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने मुख्यधिकारी प्रतिभा पाटील यांचा मार्गदर्शना खाली कारवाई केली असुन टॉवर सिल करण्यात येऊन सदर बाब कराची रक्कम प्राप्त होई पर्यत अटकाऊन ठेवण्यात आलेली आहे.

डिजीटल बॅनरवर झळकली थकबाकीदारांची नावे
या कारवाईप्रसंगी नगरपालिकेचे कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, कर निरीक्षक परशुराम ठाकरे , प्रेमानंद गावीत, वी.एन अहिरे. अंनत पाटील, नथ्थु अहिरे, रमेश सोनार, मोहमद पठाण, रविद्र बागले, गिरीश सांगळे, संतोष सोनार यांनी समक्ष हजर राहुन कार्यवाही पार पाडण्यात आली आहे. पालिका हदीत ज्या नागरीकांकडे कराची रक्कम येणे असेल त्यांनी पालिका कार्यालयात येऊन कराची रक्कम भरणा करावी अन्यथा त्यांचावर सुध्दा जप्तीची कारवाही करण्यात येईल असा इशारा नगर पालिकेने दिला आहे. आता पावेतो नगरपालिकेची 41 टक्के कर वसुली झाली आहे. तसेच बसस्थानक मार्गावर नगर पालिकेने डिजीटल ईलेक्ट्रॉनीक बॅनर लावुन त्यावर थकबाकीदारांची नावे झळकवली जात आहे. ते पाहण्यासाठी देखील गर्दी होत आहे. लोक नाव पाहण्यासाठी येत आहे. यामुळ थकबाकीे वसुली देखील चांगली होत आहे.