‘थापाड्या’ येतोय 4 जानेवारीला

0

मुंबई : बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा मराठी चित्रपट येत्या 4 जानेवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे. भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के यांची निर्मिती असलेल्या ‘थापाड्या’मध्ये अभिनेता अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, ब्रिंदा पारेख, मोहन जोशी, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या ‘थापाड्या’ या चित्रपटाच्या फर्स्ट लुकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.