भिवंडी : ठाणे जिल्हा पातळीवरील थायबॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धा राहनाळ येथील सरस्वती इंग्रजी माध्यम विद्यालयात आयोजित केली होती. जिल्ह्यातील 78 स्पर्धकांनी भाग घेतला होता. भिवंडी महापालिकेचे क्रिडा अधिकारी रमेश पोशमपल्लू, असोसिएशनचे सचिव अजित कारभारी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झाला.