थाळनेरच्या बॅकेच्या संथ कारभारामुळे लोकांचे हाल

0

थाळनेर। येथील सेन्ट्रल बॅक ऑफ इडियाचे कर्मचारी आपले काम अतिशय निष्काळजीपणाने काम करतात व त्यांचा मनमानीने कारभार सुरू आहे. त्यामुळे लोकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. शाखाधिकारी यांनी या त्रासाला कंटाळून बदली करून घेतली अशी लोकांची म्हणणे आहे. म्हणून लोकांना अजून किती त्रास सहन करावा लागणार आहे. गावातील व परिसरातील लोकांना कर्मचारी मोठ्या मोठ्या आवाज करून अपमानास्पद वागणूक देतात. बॅकेचे खाते उघडण्यासाठी 3 ते 4 माहिने वाट पहावी लागते. तर अन्य बँकेचे चेक जमा होण्यासाठी 15 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे परिसरातील व गावातील लोक बॅकेचे व्यवहारासाठी शिरपूर गाठावे लागते. त्यामुळे गावकर्‍यांकडून नविन राष्ट्कृत बॅकेची मागणी होतांना दिसत आहे.

नागरिकांच्या समस्या
मी मागील चार महीण्यापासुन माझे खाते ऊघडण्यासाठी कागदपत्र दिले होती परतूं मला त्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली गेली. या ठिकाणी नविन कर्मचार्‍याची नेमणूक करावी कि ज्यानां संगणकाचे काम चांगल्या प्रकारे करता येईल अश्या कर्मचार्‍यांना नियुक्त करावे
प्रविण शिंदे , ग्रामस्थ

बँकेतील कर्मचारी वयस्कर असल्याने कामकाजात गती मिळत नाही, पाहीजे तेवढी सहन क्षमता कर्मचार्‍यात राहत नाही.
रूपेश माळी

कर्मचार्‍यांना संगणकाचे ज्ञान नसल्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. त्यामुळे नविन संगणक येणार्‍या तरूण कर्मचारी ऊपलब्ध व्हावेत.
राधेश्याम पाटील