शस्त्र विक्रीचा डाव उधळला ; एकास अटक
थाळवेर- तलवारी विक्रीसाठी आलेल्या एका तरुणास थाळनेर पोलिसांनी अटक केली असून त्याच्य ताब्यातून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या. षीकेश उर्फ कमलेश रमणसिंग राजपूत (20, अहिल्यापूर, ता.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 20 रोजी सायंकाळी उशिरा अहिल्यापूर गावातील आर.सी.पटेल हायस्कूलमागे ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध विजय जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीनुसार कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, जे.जी.महाले, आर.के.शेख, नरेश मंगळे, आर.एस.बैसाणे, सिराज खाटीक, दावल सैंदाणे, कृष्णा पावरा आदींनी गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून सात हजार रुपये किंमतीच्या पाच तलवारी तसेच सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.