थाळनेरला धरमखाई नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ

0

शिरपूर। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील धरमखोई नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ प्रियदर्शनी सुतगिरणीचे चेअरमन व शिरपूर नगपालिका उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्याहस्ते करण्यात आले. शिरपूर तालुक्यात आमदार अमरीशभाई पटेल यांनी सन 2002 पासून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. शिरपूर पॅटर्नअंतर्गत तालुक्यात अनेक नाल्यावर ठिकठिकाणी नाले खोलीकरण बंधारे बांधले आहेत. त्यानंतर आता विहीर पुनर्भरणाची कामे त्यांनी हाती घेतली आहेत. त्यानुसा आ.अमरीशभाई यांनी नुकताच थाळनेर परीसरात पाहणी केली.

यावेळी शेतकर्‍यांनी थाळनेर, भोरटेक, मांजरोद, भाटपूरा, पिळोदा, जापोरा आदी गावातील पाण्याची पातळी कमी झाली असून बोअरवेल्स आटल्या आहेत अशी माहिती दिली. परीसरात 16 विहीर पुणर्भरणाचे काम सुरू असून त्यासाठी 47 लाख रू. देण्यात आले आहेत. तसेच परीसरातील सर्वात मोठा धरमखोई नाल्यावर मागील वर्षी आमदार अमरीशभाई पटेल यांनी 4 बंधारे बांधले आहेत. त्याअनुषंगाने शेतकर्‍यांची मागणी बघता तात्काळ निर्णय घेवून धरमखोई नाल्याजवळील सिमेंट बंधार्‍यापासून ते तापी नदीपर्यंत खोलीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज भरल्यानंतर त्या बॅक वॉटरने सदर धरमखोई नाला भरण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यात पाऊस जर कमी झाला तरी धरमखाई नाल्यावरील सर्व बंधारे भरण्यासाठी अनेर पाटचारीचे पाणी टाकून भरण्यात येणार आहेत.यावेळी धुळे जि.प.चे माजी कृषी सभापती नरेंद्रसिंह जमादार, शिसाका संचालक के.डी.पाटील, शिरपूर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन डॉ.डी.बी.पाटील, माजी सरपंच प्रकाश चौधरी, थाळनेर पिक संरक्षण सोसायटी चेअरमन एकनाथ जमादार, भोरटेक माजी सरपंच अशोक पाटील, मांजरोद सरपंच भुलेश्‍वर पाटील, थाळनेरचे माजी रसपंच भरत मराठे, भोरटेक सरपंच रामकृष्ण चौधरी भाटपूरा सरपंच शैलेंद्र चौधरी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रियदर्शनी सुतगिरणी संचालक भुपेशभाई पटेल यांनी शेतकर्‍यांना नाला खोलीकरण करत असताना निघणारा गाळमाती शेतकर्‍यांनी शेतात टाकण्यासाठी ट्रॅ़क़्टरने घेवून जाण्याचे सांगितले.