थाळनेर । थाळनेर येथील परिसरात अवैध धंद्याना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे उत आले आहे. गावात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू सकाळी तीन वाजेपासून ते रात्री बारापर्यंत विकली जात असल्याने गावठी दारू घेण्यासाठी तळीरामांची चांगलीच रांग लागतांना दिसून येत आहे. या बाबत पोलिसांना संपुर्ण माहिती पोलिसांना असूनही जाणूनबजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केल्यानंतरही पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.
रात्री उशीरापर्यत होते विक्री
रात्री बारापर्यंत दारू विकली जात असल्यामुळे गावातील गल्ली गल्लीतील विकली जाते. तापी काठालगत असलेल्या हातभट्टी दारू तयार केली जात असून गावात सर्वात जास्त बसस्थानकाजवळ विकली जाते. या दारूच्या व्यसनामुळे तरूण पिढीसुद्धा आहारी जात असल्यामुळे शाळेत जाणार्या मुलींची छेड काढली जाते, प्रवाश्यांची लूटमार होत आहे. याप्रकरणावरून दारू विक्रेत व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे साटेलोटे असल्याचे परीसरातून बोलले
जात आहे.
तक्रारदारांचीच होते पिळवणूक
दारू विक्रेत्यांविरोधात एखाद्या तक्रार पोलिसात दिल्यानंतर तक्रारदारांची पोलिस व दारू विक्रेते पिळवणूक करून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्याची प्रमाण वाढले आहे. डामसरपाडा, खंडेरावपाडा, नावाडीपाडा, कुंभारटेकपाडा, नावलपुरा, बसस्टँड अशा विविध ठिकाणी दारू विकली जाते, बसस्टँड भगत तर गांजा, ताडी, अशी अवैध धंदे चालतात परंतु पोलीस प्रशासन मात्र झोपले असून आज गावात दहशतीचे गुंड प्रवृत्तीचे वातावरण निर्माण होत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून अवैध धंद्यांवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.