थाळनेर येथे धरमखोयी नाल्यातून गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

0

शिरपूर: तालुक्यातील थाळनेर येथील धरमखोयी नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील विविध भागातील जलसिंचनाची अनेक कामे यशस्वीरीत्या पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने थाळनेर येथील धरमखोयी नाल्यात मंगळवार 6 जून रोजी दुपारी 12 वाजता गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

नाल्यातील गाळ टाकणार शेतात
या नाल्यात 2.83 कोटी लिटर पाणी थांबेल. तसेच धरमखोयी नाल्यात जे शिरपूर पॅटर्न अंतर्गत काम सुरु आहे त्यामुळे 3600 कोटी पाणी साचणार असल्याची माहिती देण्यात आली. या नाल्यातील गाळ शेतकरी बांधवांच्या शेतात टाकून शेती सुपीक करण्याचा दुहेरी फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे. अनेर डॅम सेक्शन इंजिनिअर टी.आर.दोरीक, लघुप्रकल्प ज्युनिअर इंजिनिअर हितेश भटूरकर यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आले. येथील साठवण बंधारा गाळमुक्त् करण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर पाटील, आर.के.शिंदे, शिसाका माजी व्हा. चेअरमन एकनाथ जमादार, जि.प. माजी उपाध्यक्ष के.डी.पाटील, सर्जेराव पाटील, गोपाल भंडारी, यशवंत बाविस्क्र, भरत मराठे, धनराज मराठे, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, कारखाना संचालक नारायणसिंग चौधरी, अशोक पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, भुलेश्वर पाटील, माजी पं.स. सदस्य प्रकाश चौधरी, योगेंद्र पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, प्रदीप पाटील, भैया पाटील, भाऊसाहेब पाटील, जितू पाटील, लक्ष्मण पाटील, रमेश तलवारे, अरुण शिंदे, सुरेश पाटील, रमेश शिरसाठ, ओंकारसिंग परदेशी, अनेर डॅमसेक्शन इंजिनिअर टी.आर.दोरीक, लघुप्रकल्प् ज्युनिअर इंजिनिअर हितेश भटूरकर, स्वीय सहाय्य्क अशोक कलाल, स्वीय सहाय्य्क सुनिल जैन, पंचक्रोशीतील अनेक पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ झाल्यामुळे थाळनेर परिसरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.