जळगाव । येथील गोदावरी अभियांत्रिकीत उल्हास 2017 वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात थीम डे, एक मिनीट, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून चांगलीच धम्माल केली. तसेच विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धोंमध्ये सहभाग नोंदवत जल्लोष केला. गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात महाविद्यालयात प्राचार्यांसह प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांकडून नाटीका सादर
या संमेलनाचा शुभारंभ माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, डॉ केतकी पाटील, प्राचार्य डॉ व्ही जी अराजपूरे, उपप्राचार्य प्रविण फालक,प्रा व्ही एन पाटील, डॉ के पी राणे, डॉ नितीन भोळे, प्रा प्रमोदगीरी गोसावी, प्रा अतुल बर्हाटे, डॉ. विजयकुमार वानखेडे, स्नेहसंमेलन प्रमुख अनिलकुमार विश्वकर्मा, सेंकड शिप डिप्लोमाचे प्राचार्य के.व्ही.धांडे, प्रा चंद्रकांत सातपूते आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदा पूजनाने करण्यात आला. स्नेहसंमेलनात थीम डे अंतर्गत दमलेल्या बापाची कहानी हि नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच एक मिनीट शो, संगीत खुर्ची या स्पर्धांनी बालपणीतील आठवणींना उजाळा मिळाला. आज महाविद्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक
यावेळी शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. आज 21 रोजी साडी डे,फॉर्मल डे, रॅम्प वाकॅ, रोज डे, 22 रोजी रागोंळी,मेहंदी, पेन्टींग,शेलापागोटे, बक्षीस वितरण तर 23 रोजी माजी खा डॉ उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान, व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.