थेंब अमृताच्या कामाला लोकसहभागातून सुरुवात

0

संतांनी दिले आशीर्वाद ; उपक्रमाचे समाजमनातून कौतुक

फैजपूर- थेंब अमृताचा लोकसहभागातून जलसमृद्धी जलक्रांती अभियानाचे संत महंत आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर लगेच 3 मे पासून सकाळी सात वाजताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. यात निंभोरा येथील सुकी नदी पात्रात वडगाव चिनावलच्या जुन्या तुटलेल्या पुलाच्या उत्तरेस 30 मीटर अंतरावर चर खोदण्यात आला.त्याची लांबी 230 फूट, रुंदी 15 फूट तर खोली 10 फूट आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून निवडलेल्या जागेवर हा चर खोदण्यात आला असून असे सात चर उत्तर बाजूने अजुन खोदण्यात येणार आहेत. हिगोणा येथे मोर नदी पात्रात एक आडवा चर करण्यात आला आहे. सांगवी बुद्रुकला ईझवाय नदीवर 12 खोल 47 फूट रूंद 56 लांब एक गड्डा तयार करण्यात आला आहे. हे काम 885 घनमीटर झाले आहे.

महामंडलेश्वरांनी दिली उपस्थिती
हे काम सुरू असताना प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी उन्हाची पर्वा न करता प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी भेट दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. त्यांच्यासोबत आमदार हरीभाऊ जावळे, हिराभाऊ चौधरी, हर्षल पाटील, पाटबंधारे विभागाचे के.पी.पाटिल, मुरलीधर इंगळे, पिंटू राणे, व.पु.होले, गुरुकुलचे प्रिन्सीपल संजय वाघुळदे उपस्थित होते. मनोज वायकोळे, के.जी.पाटील, मोहन इंगळे, सुनील कोंडे, दीपक चौधरी आदी स्वयंसेवकदेखील उपस्थित होते. या उपक्रमास ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोकसहभाग लाभत आहे.