तिरुअनंतपूरम :केरळमधील जनजीवनआठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं विस्कळीत झालं आह. याच बचाव कार्यादरम्यान १७ ऑगस्ट रोजी कोच्चीमधील अलवा येथे भारतीय नौदलाने सुजीता जबेल या गर्भवती महिलेबरोबरच अन्य एका महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले.
राष्ट्रीय बचाव पथकांसोबत भारतीय नौदलाचे शेकडो जवान पुरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. यानंतर नौदलाच्या जवानांनी तिला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. जवानांनी प्रसंगावधान दाखवत त्या महिलेला जवळच्याच संजीवनी रूग्णालयात दाखल केले. सुजीताला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन केले. अन् सुजीताने एक गोंडस बाळाला जन्म दिला.
हॅलिकॉप्टरच्या मदतीने दोरीचा वापर करुन सुजीताला सुखरुप बाहेर काढणाऱ्या नौदलामधील पायलट विजय वर्मा आणि नौदलाच्या सर्वच जवानांच्या कार्याला धन्यवाद म्हणण्यासाठी जबेल कुटुंबाने त्यांच्या घराच्या गच्चीवर पांढऱ्या रंगाने थंक्स असा एका शब्दाचा संदेश लिहिला आहे. अलवा येथून ज्या घराच्या गच्चीवरून सुजीता आणि आणखीन एका महिलेला एअरलिफ्ट करण्यात आले त्याच गच्चीवर हा संदेश लिहीण्यात आला आहे. सध्या इंटरनेटवर हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. या घराचे हॅलिकॉप्टरमधून काढलेले फोटो भारतीय नौदलाच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आले आहेत.