साक्री तालुक्यातील 33 गावाच्या सरपंच निवड ही थेट जनतेतुन होणार असल्याचे राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नेत्यांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. साक्री तालुक्यातील बळसाणे ग्रामपंचायत ही शिंदखेडा मतदारसंघात असल्याने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंत्री जयकुमार रावळ करीत आहेत. या मतदारसंघाचे आमदार आहेत. ही ग्रामपंचायत भाजपा ताब्यात घेण्यासाठी त्याचे सहकारी व दोडाईचा कुउबा समितीचे सभापती नारायण पाटीलसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रणनिती आखत आहे. तसेच जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य व सरपंच निवडुणक आण्यासाठी नियोजन करीत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदिप बेडसे ही कार्यकर्ता व पदाधिकारींची भेटीगाठी सुरु करुन निवडून येणार उमेदवारांची चाचणी घेत आहे.
बळसाणे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच निवडून आणयासाठी कंबर कसली आहे. तसेच भाजपा व राष्ट्रवादी पक्षाने अतापासुन फिल्डींग लावण्यासाठी तयारी सुरु केली आहे. कासारे ग्रामपंचायत ही शिवसेना साक्री तालुका प्रमुख विशाल देसले यांच्या वहिनी माहेश्वरी देसले विघमान सरपंच आहेत. कासारे ग्रामपंचायत ही शिवसेनाच्या ताब्यात आहे. धुळे जिल्हा पालकमंत्री दादा भूसे यांच्या जवळ सैनिक विशाल देसले आहेत. याकडे सर्व तालुक्याचे नजर आहे. तसेच काँग्रेसचे उत्तमराव देसले, दिलीप काकुसते, सुभाष देसले, सचिन देसले, गोकुळ परदेशी, अशोक देसले, विकास देसले, अशोक देसले असे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकार्यांची प्रतिष्ठा निवडणूकीत पणाला लागणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यां मध्ये उत्सह वाढला आहे. भारताचे संरक्षण राज्यमत्री डॉ सुभाष भामरे हे मुळ मालपुर कासारे गावाचे असल्याने विशेषःता लक्ष असणार आहे. भाजपापक्षाने संपूर्ण 33 सरपंच निवडणूकासाठी भाजपा कार्यकर्ते उतवणार आहेत. याठिकाणी भाजपा, सेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ने तयारी सुरू केली आहे. कुडाशी ग्रामपंचायत ही काँग्रेसचे आमदार डी. एस. अहिरे व माजी आमदार योगेद्र भोये व भाजपाचे डॉ तुळशीराम गावीत. धुळेचे माजी महापौर मंजुळा गावीत यांचे गाव आहे. याठिकाणी भाजपा व काँग्रेस यांच्या पदाधिकारी व कार्यकर्तांनी निवडणुकसाठी तयारी सुरु केली आहे. तसेच दहिवेल ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस वसंत राव बच्छाव आदीं नी भाजपा व काँग्रेस अशी चुरस निर्माण होणार आहे.
तसेच साक्री तालुक्यातील भामर, जाभोरे, वरसुस, कालदर,भोनगाव, सुकापुर, दरेगाव, खरडबारी, वाकी, भडगाव व नागपुर व जमखेल पागण, काळटेक पिपळगाव बु., बसरावळ, चरणमाळ, तमासवाडी, वसमार, धाडण, पेटले उभंड, पानखेडा, खरगाव, किरवाड, जंभोरे, आमोडे, देशशीरवाड, देगाव भाडणे असे 33 गावांच्या सरपंच व ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम लागला आहे. यात भाजपाचे सुरेश रामराव पाटील, संजय अहिरराव, डॉ. तुळशीराम गावित, इजि. मोहन सुर्यवंशी, वसंतराव बच्छाव, शिवसेनेचे विशाल देसले, भुपेश शाह व काँग्रेसचे शिवाजीराव दहिते, पोपटराव सोनवणे, दिलीप काकुसते, उतमराव देसले, गोकुळ परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे, प्रा. नरेन्द्र तोरवणे, अमित नागरे, चंद्रकांत पवार विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली असुन प्रथम थेट जनतेतुन सरपंच निवड होणार आहे. यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांनी अतापासून फिल्डींग व नियोजन करीत आहेत. 33 ग्रामपंचायतीचा सरपंच निवडणूकीत किती पक्षाच्या पदाधिकारींची जित होते याकडे साक्री तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 33 पैकी 20 ग्रामपंचायत महिला सरपंचपदासाठी आरक्षीत आहेत. यामुळे निम्मेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. थेट जनतेतुन संरपच निवड होणार असल्याने मुख्य राजकीय पक्ष भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विविध पक्षाकडून उमेदवार चाचपणीला सुरुवात केली आहे. विविध गावात महिला आरक्षण असल्याने कभी खुशी कभी गम अशी स्थीती झाली आहे. गावातील हौशे तरूण, युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बाधुन रिगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका ही मिनी मंत्रालय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीचा अभ्यास तालीम आहे. सन 2018 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार आहे. सन 2019 ला लोकसभा निवडणूक होणार असल्याने आतापासून कार्यकर्त्यांना निवडणूकीचे धडे दिले जात आहे. पक्षाच्या प्रचारासाठी प्रशिक्षणाची तयारी सुरू केली आहे. गावात किती मतदार आहे व किती मयत आहे, किती बाहेरगावी आहे, किती मतदाराचे डबल नावे आहेत यांच्या अभ्यास राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते करतांना दिसत आहेत. साक्री तालुक्यातील काही गावे शिदखेडा विधान सभा मतदान संघात येत असल्याने रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ व नंदुरबार लोकसभा मतदार संघात साक्री तालुकाअसून यासाठी खासदार डॉ. हिनाताई गावित व साक्री तालुक्याचे भुमीपुत्र भारताचे संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे तसेच साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे व जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी राव दहिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप बेडसे हे तालुक्याचे रहीवासी आहेत. यासाठी ग्रामपंचायत निवडणूकीत विशेष लक्ष असणार आहे.
-ताहेरबेगमीरजा,निजामपूर
8007593636