थेरगावच्या एकास तीन वर्ष सक्तमजुरी

0

पिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने विशेष न्यायालयाने थेरगावातील रहिवासी असलेला शंकर जिवारामजी प्रजापती (वय 26, रा. थेरगाव) या आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. 13 नोव्हेंबर 2015 रोजी दुपारी तीनच्या सुमारास थेरगावात ही घटना घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

सहा साक्षीदार तपासले
आरोपी शंकर प्रजापती याचे दुकान होते. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी पेन आणण्यासाठी त्याच्या दुकानात आली होती. त्याचवेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा खटला विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांच्या न्यायालयात चालला. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. जावेद खान यांनी सहा साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावे आणि अ‍ॅड. खान यांचा प्रभावी युक्तिवाद यामुळे आरोपी प्रजापती याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप सिद्ध झाला. त्यामुळे न्यायाधीश जहागीरदार यांनी आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.