पिंपरी : थेरगावमधील सदगुरू कॉलनी, अशोक सोसायटी या भागात मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने रस्त्यावर तळे साचले आहे. घरासमोर गटारगंगा झाल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. थेरगावच्या अशोक सोसायटी, सदगुरूनगरमधील ड्रेनेजलाईन जुनी झाल्यामुळे वारंवार ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. मागील आठ दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना कारावा लागत आहे. सापसफाई काम ठेकेदार बीव्हीजी कंपनीकडे आहे. त्यांच्याकडून वेळेत लक्ष दिले जात नाही. तसेच, ही ड्रेनेज लाईन बदलण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. येथील नारिकांनी नगरसेवक कैलास बारणे यांना बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली. ड्रेनेज लाईन दुरुस्ती न झाल्यास पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी यांनी दिला आहे.