थेरगावमध्ये वृध्द महिलेस मारहाण करुन केली 1 लाखांच्या दागिन्यांची लूट

0

पिंपरी – एका 70 वर्षीय वृध्द महिलेला दुकानात नेऊन लाईट बंद करुन तोंडावर मारहाण करत जवळील एक लाख चौदा हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.12) रात्री साडेआठच्या सुमारास थेरगाव येथील क्रांतीवीर नगरमध्ये असलेल्या फरशीच्या दुकानात घडली.
दिपक बंडु वाघमारे (वय 23, रा. थेरगाव) असे वृध्द महिलेस मारहाण करुन दागिने लुटून नेहणार्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी 70 वर्षीय वृध्द महिलेने दिपक वाघमारे याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 70 वर्षीय वृध्द महिलेचे थेरगाव येथील क्रांतीवीर नगरमध्ये फरशीचे दुकान आहे. गुरुवारी (दि.12) रात्री साडेआठच्या सुमारास त्या दुकानात असताना आरोपी दिपक वाघमारे याने त्यांना जबरदस्तीने दुकानात नेले. तसेच दुकानातील लाईट बंद करुन त्याच्या चेहर्‍यावर मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या जवळ असलेल्या कमरेच्या पिशवीतील तब्बल एक लाख चौदा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम आरोपीने जबरदस्तीने हिसकावून नेले. आरोपी अद्याप फरार आहे. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.