थेरगावातील ट्रान्सफॉर्मरला लागली आग

0
दुचाकी, टेम्पो जळून खाक
चिंचवड : थेरगाव, येथील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक लागलेल्या आगीत एक दुचाकी, टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज (शनिवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. थेरगावातील शिवशंभो सोसायटी परिसरात ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला सकाळी अचानक आग लागली. यामध्ये एक दुचाकी आणि टेम्पो जळून खाक झाला आहे. संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे दोन बंब, रहाटणीतील एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंनतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, बाजूलाच लाकडांची वखार होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.