पिंपरी:वटपोर्णिमेला वडाची पूजा केली जाते. मात्र यातून मोठ्या प्रमाणात झाडाचे नुकसान होते. या एका दिवसात केवळ श्रद्धेपोटी असंख्य वडाच्या फांद्यांची पुजा करण्यासाठी कत्तल होते.
ज्या वडाची पुजा करुन सावित्रीने सत्यवानाच्या प्राणाचे रक्षण केले त्या वडाचे आपण संरक्षण व संवर्धन करायला हवे या भावनेतून थेरगाव येथील मयुरबाग काॅलणीतील महीलांनी यावर्षीं वड्याच्या फांद्या न तोडता, वडांचे झाडच आणुन त्याची पुजा करुन एक अनोखा संकल्प केला.
या महिलांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.