व्हिसेरा प्रीझर्व्ह : वाघाच्या मृत्यूनंतर शव नदीपात्रात टाकल्याचा दाट संशय
भुसावळ- मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळ्याच्या नदीपात्रात आठ ते दहा वर्षीय वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. वनविभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत चारठाण्यातील वनविभागाच्या कार्यालय आवारात सोमवारी सकाळी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा नाशिकच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. चार दिवसात मृत्यूच नेमके कारण कळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वाघाची शिकार नसलीतरी कुठल्यातरी ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शव नॉयलॉन दोरीने ओढून नदीपात्रात टाकण्यात आले असल्याची दाट शक्यता आहे.
यांची होती उपस्थिती
धुळ्याचे मुख्य वनसंरक्षक तुकाराम साळुंखे यांच्या वाघाच्या मृतदेहाला चारठाणा जंगलातील भवानी माता मंदिर परीसरात अग्निडाग दिल्यानंतर शासकीय ईतमामात मानवंदना देण्यात आली. प्रसंगी जळगावचे उपवनसंरक्षक दिगंबर पवार, धुळे दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी उमेश वावरे, मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक देसाई, सहाय्यक वनरक्षक राजेश दसरे, सहाय्यक वनरक्षक संजय मोरे, जळगाव गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल धनंजय पवार, मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल प्रकाश वराडे, जामनेर क्षेत्रपाल समाधान पाटील, पाचोरा वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार तमरूडकर, डॉ.डी.बी.चव्हाण, डॉ.आर.एस.भांगरे, डॉ.ए.यु.कांबळे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.