मुंबई: काल राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते माजी उपमुख्यमंत्री आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही. ते नेमके कुठे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान ते आज माध्यमांसमोर येणार असून पत्रकारांशी चर्चा करणार आहे. थोड्याच वेळात ते माध्यमांसमोर येणार आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कल्पना नसल्याचे सांगितले होते. मात्र अजित पवारांनी त्यांच्या मुलांशी याबाबत चर्चा केल्याचे शरद पवारांनी सांगितले. राजकारणात नाहक बदनाम केले जाते, असे सांगून अजित पवारांनी त्यांच्या मुलांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचे शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होत.