मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. यावर आज रविवारी तातडीने सुनावणी घेण्यात येत आहे. थोड्याच वेळात याबाबत सुनावणी होणार आहे. कॉंग्रेसतर्फे कपिल सिब्बल तर सरकारकडून सॉलीसीटर जनरल तुषार मेहता कोर्टात भूमिका मांडणार आहे.
राष्ट्रपती राजवट उठवून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर शिवसेनेसह राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांनी केले आहे. यावर आज सुनावणी होत आहे. सुनावणीसाठी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नवनियुक्त गटनेते जयंत पाटील यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांच्या कार्यालयाला नियुक्तीचे पत्र सोपविले. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.