मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधान सभेत तर राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात मांडला जाईल. त्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी निधीची घोषणा आणि तरतूद होणार आहे. अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.