थोड्या पावसानेच गटार ब्लॉक झाल्याने पालिकेची पोलखोल

0

जळगाव । शिरसोली रोड, इच्छादेवी चौक आंबा माता मंदिरा समोर महापालिकेचे पुर्णपणे दुर्लक्ष झाला असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केला आहे. शिरसोली रोडवरील मंदिरासमोरील भागात थोडा देखील पाऊस झाला तर गटारी पुर्णपणे ब्लॉक झालेल्या असल्याने तिथे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे तेथे तलावसदृष्य परिस्थिती निर्माण होते. हे पाणी दुकान व घरांमध्ये शिरते. तेथे कमरे इतके पाणी सचत असते.

दुकानांमध्ये शिरले पाणी
ही गटार वर्षंनुवर्ष साफ होत नसल्याचा आरोप नगरसेवक सोनवणे यांनी केला आहे. अशा परिस्थितीमुळे भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याकडे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी लक्ष देवून परिस्थिती सुधारावी अशी मागणी केली आहे. आजच्या पावसाने आरोग्य विभागाने केलेला नाले सफाईचा दावा फोल ठरला असल्याचे नगरसेवक सोनवणे यांनी आरोप केला आहे. गटारीचे पाणी गल्लीमध्रे शिरसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हाल झाले. हे गटारीचे पाणी दुकानात शिरल्याने दुकानदारांना मनस्ताप झाला.