थोरगव्हाणला तलवारीच्या धाकावर दहशत दोघे तरुण सावदा पोलिसांच्या जाळ्यात

सावदा : रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील बसस्थानक चौकत धारदार तलवारीच्या जोरावर दहशत निर्माण करणार्‍या दोघांच्या सावदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांच्या ताब्यातून दोन तलवार जप्त करण्यात आल्या. आकाश विष्णू सपकाळे (22) व अनिल मनोहर तायडे (21, दोन्ही रा. रायपूर, ता. रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवार, 29 रोजी रात्री 9.5 वाजता ही कारवाई करण्यात आली.

दोघा संशयीतांना तलवारीसह पकडले
सावदा सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले यांना रायपूर फाट्यावर संशयीत तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. एपीआय इंगोले यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हवालदार पांडुरंग सपकाळे, विजय पोहेकर, उमेश पाटील, खोडपे, यशवंत टहाकळे, मेहेरबान तडवी आदींनी थोरगव्हाण गाठल्यानंतर संशयीतांनी पळ काढला मात्र पाठलाग करून संशयीतांना तलवारींसह पकडण्यात आले. मनोजकुमार सखाराम हिरोळे यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्या, संशयीतांच्या ताब्यातून पंधराशे व आठशे रुपये किंमतीच्या दोन धारदार तलवार जप्त करण्यात आल्या आहेत. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले करीत आहेत.