थ्रो बॉल स्पर्धेत सिटी प्राईडने पटकावले अजिंक्यपद

0
जयहिंद हायस्कुलला मिळाले उपविजेतेपद
पिंपरी : शालेय जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात निगडीच्या सिटी प्राईड संघाने शनिवारी अजिंक्यपद पटकावले. जयहिंद हायस्कुलला उपविजेतेपद तर इंदिरा नॅशनल वाकडचा संघाला तृतीय क्रमांक मिळाला. अंतिम सामन्यात सिटी प्राइडच्या संघाने जयहिंदच्या संघावर 15-5, 16-14, 2-0 अशी मात करीत विजय मिळवला. विजेत्या संघाच्या धनश्री भांडारकर, समृद्धी जमदाडे, वैष्णवी भोंडवे, यांनी तर पराभूत संघाकडून ज्योती यादव, साक्षी खेत्रे, सिद्धी माने यांनी चांगला खेळ केला. जयहिंद हायस्कुल (अदिती लांडगे, ज्योती यादव, इशिका खंडेलवाल, ऋतिका बन्सल )वि. वि. इंदिरा नॅशनल ( धनश्री पाटील, शिवानी डोईफोडे, प्रांजळ जमदाडे) 15-12, 15-0, सिटी प्राईड,निगडी (धनश्री भांडारकर, तनया सपकाळ, समृद्धी जमदाडे ) वि. वि. मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय (श्रुती बुरडे, मनाली सावंत, आकांक्षा जैद ) 15-1, 15-5 (2-0).