जळगाव। तालुक्यातील आव्हाणे गावी पूर्ववैमनस्य व शेतात बकर्या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून दोन गटात 4 रोजी वाद होवून हाणामारी झाल्याची घटना घडली होती.
यानंतर दंगलीतील गुन्ह्यातील बंटी उर्फ दत्तु जोंगेद्र अरूण साळुंखे, अरूण बुधा उर्फ गोविंदा साळुंखे , राजेंद्र कालीदास सोनवणे , लक्ष्मीकांत अरूण साळुंखे या चौघा संशयितांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली असताना त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.